¡Sorpréndeme!

Jammu Kashmir Pahalgam Update | दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यात

2025-04-27 1 Dailymotion

Jammu Kashmir Pahalgam Update | दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यात 
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर शनिवारी छापे मारले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या 446पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. 
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात गेल्या दोन दशकांतील सर्वांत मोठी कारवाई; घेतली जातेय कसून झडती  काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर शनिवारी छापे मारले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.  पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू  फ्रंट या संघटनेने स्वीकारली आहे. तिला पाकिस्तानचे पाठबळ असल्याचा भारताचा आरोप आहे. दहशतवाद्यांच्या साथीदारांना जेरबंद करण्यात आले. शनिवारी श्रीनगरमधील सौर, पांडच, बेमिना, शालटेंग, लाल बाजार आदी भागांमध्ये छापे टाकण्यात आले. अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे.   या कारवाईत आतापर्यंत ४४६ पेक्षा जास्त लोकांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. दहशतवाद्यांचे जाळे नष्ट करणे, तसेच भविष्यातील हल्ल्यांना रोखण्यासाठी वेळीच पावले उचलणे हा या कारवाईचा उद्देश आहे. आणखी काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असून, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे कळते.